पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून मालवणात शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मालवण : मालवण शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या वह्यांचे वाटप शनिवारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात आले.

शहरातील टोपीवाला हायस्कूल, टोपीवाला प्राथमिक शाळा, रोझरी इंग्लिश स्कूल, कन्याशाळा मालवण, जय गणेश स्कूल, धुरीवाडा जि प शाळा, जि.प रेवतळे फाटक शाळा, देऊळवाडा जि प शाळा, कुडाळकर हायस्कूल, दांडी जि प शाळा या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वह्याचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. पूजा करलकर, महिला शहर अध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, नंदू देसाई, महेश सारंग आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!