लायन्स क्लब झोन चेअरमनपदी विश्वास गांवकर यांची नियुक्ती

मालवण : मालवण लायन्स क्लबचे दोन वेळा अध्यक्षपद भुषवित ‘आऊटस्टँडिंग प्रेसिडेंट’ यांसह अन्य अवॉर्ड प्राप्त करणाऱ्या ला. विश्वास गांवकर यांची लायन्स क्लब झोन चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि मालवण हे चार क्लब सेवाकार्य करणार आहेत.

मालवण लायन्स क्लबच्या पदग्रहण कार्यक्रमात विश्वास गांवकर यांना इंटरनॅशनल मल्टिपल लायनची पिन देऊन पदग्रहण अधिकारी विजय जमदग्नी यांच्या हस्ते सन्मानित आले. यावेळी लायन्स क्लब पदाधिकारी उपस्थित होते. विश्वास गावकर यांनी वर्ष २०२१-२२ आणि २०२३-२४ या दोन वर्ष कार्यकाळात लायन्स क्लब मालवण अध्यक्षपद भूषवताना चांगले सेवाकार्य केल्याचे सांगत मान्यवरांनी त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3499

Leave a Reply

error: Content is protected !!