हिवाळे, ओवळीये येथील अतिवृष्टीत वाहून गेलेल्या साकवांची भाजपा नेते निलेश राणेंनी केली पाहणी

पावसाळ्यानंतर उपाययोजना करण्याचे आश्वासन 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील हिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव आणि ओवळीये शाळा नं. १ रामेश्वर मंदिर नजिकचा साकव हे दोन साकव  अतिवृष्टीमुळे वाहून गेले होते. यामुळे येथील गावांचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन या साकवांची पहाणी केली. यावेळी पावसाळ्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली आहे. यावेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी सभापती सुनिल घाडीगांवकर, माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण,  सरपंच रघुनाथ धुरी, राजेंद्र हिवाळेकर, रमेश राठोड, बळीराम धुरी, बबन परब  आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!