माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंचा वाढदिवस मालवणात सामाजिक उपक्रमांनी साजरा
विजय केनवडेकर, गणेश कुशे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
मालवण : भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर आणि माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या वतीने मालवण तालुक्यातील १०० शिशुरंजन मधील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, पप्पू गावकर व शिक्षक वर्ग उपस्थित होते.