माझ्या विधानसभेच्या तिकिटाचं वैभव नाईकांना जास्त टेन्शन ; निलेश राणेंचा टोला
रोज उठून माझ्या कामाचा पाठलाग करणे आणि पक्षातल्या दोन तीन टुकार लोकांना माझ्यावर टीका करण्यासाठी पगारावर ठेवलंय
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांना टोला लगावला आहे. मला विधानसभेची तिकीट मिळणार की नाही याचं टेन्शन वैभव नाईकांना जास्त आलेले दिसते” अशी पोस्ट निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून केली आहे.
कांदळगाव प्राथमिक शाळेच्या छप्पराची पडझड झाल्याने प्रशासकीय बाबीमुळे या दुरुस्तीच्या कामाला होणारा विलंब लक्षात घेऊन निलेश राणे यांनी स्वखर्चातून ह्या कामाला सुरुवात केली आहे. यावरून ठाकरे गटाच्या एक दोन पदाधिकाऱ्यांनी टीका केली होती. या टिकेचा निलेश राणे यांनी आपल्या पद्धतीत समाचार घेतला आहे. याबाबत आपल्या एक्स अकाउंट वरून त्यांनी पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणतात, “मला विधानसभेची तिकीट मिळणार की नाही याचं टेन्शन वैभव नायकांना जास्त आलेले दिसते… रोज उठून माझा सोशल मीडिया आणि कामाचा पाठलाग करणे आणि दोन-तीन पक्षातले टुकार लोकांना माझ्यावरती टीका करण्यासाठी पगारावर ठेवणे याचा अर्थ वैभव नाईक मला घाबरले असं मी म्हणणार नाही, पण ती भीती ते त्यांच्या कृतीतून दाखवत आहेत. मी कुडाळ मालवण मतदार संघाचे काम एका आमदाराने कसं करावं हे त्यांना दाखवत आहे, त्याच्यातून ते जर काही शिकत असतील तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे.” असं निलेश राणे यानी म्हटलं आहे.