निलेश राणेंची शब्दपूर्ती ; कांदळगाव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीला स्वखर्चाने सुरुवात 

शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी घेतला निर्णय ; ग्रामस्थांतून समाधान

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ ची इमारत कोसळल्याची दुर्घटना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी घडली होती. सुदैवाने यावेळी शाळेत असलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना दुखापत झाली नाही. या दुर्घटनेची भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दखल घेत दोन दिवसांपूर्वी या शाळेला भेट देऊन इमारतीची पाहणी त्यांनी घेतली. यावेळी शाळा दुरुस्तीसाठी उपाययोजना करण्याची ग्वाही ग्रामस्थांना देत शासनाकडून हे काम नियोजित वेळेत होत नसेल तर आपण स्वखर्चाने हे काम करून देऊ, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार बुधवारपासून या शाळा दुरुस्तीच्या कामाला निलेश राणेंच्या वैयक्तिक खर्चातून सुरुवात करण्यात आली आहे. याबद्दल येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी आभार मानले आहेत.

मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नं-२ या शाळेच छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती, या संदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी कांदळगाव येथे भेट देऊन शाळेची पहाणी करून संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले. जर प्रशाससकीय बाबींमुळे याबाबत कार्यवाही करण्यास विलंब होत असेल तर आपल्या स्वखर्चातून शाळा दुरुस्तीचे काम करण्याची व्यवस्था करण्याचा शब्द त्यांनी दिला होता.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!