जिल्हा रुग्णालयाच्या वतीने तिरळेपणा प्रवर्गातील मुलांची तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कुडाळ मध्ये उपक्रम ; ९८ लाभार्थ्यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील तिरळेपणा प्रवर्गातील मुलांचे तपासणी शिबीर जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे नुकतेच पार पडले. या शिबिराचा ९८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामधील ६० मुलांची यशस्वीपणे तपासणी करण्यात आली.
या शिबिरास अनुराधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली येथून तज्ञ उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. श्याम पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद वालावलकर, निलेश गावडे (DAM), दयानंद कांबळी(DPM), राजेश पारधी(DPS), विक्रम कांबळे (DEIC MANAGER), डॉ अमोल दुधगावकर, डॉ मुक्ता दुधगावकर, डॉ मीनाक्षी गंगावणे, डॉ. रामदास रेडकर, डॉ श्रेयस परब, डॉ जागृती ढोके, डॉ निलेश अटक तसेच विश्वनाथ राव, श्रीम एकता वराडकर तसेच आरबीएसके टीम उपस्थित होते.