ठाकरे सरकारमधील मंत्र्याला अटक ? किरीट सोमय्या यांच्या ट्विटमुळे खळबळ

कुणाल मांजरेकर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील एका मंत्र्याला अटक झाल्याचं ट्विट भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे. या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.

राज्य सरकार मधील गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे. मात्र अद्याप पर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने या ट्विट वरून गोंधळ उडाला आहे. काही महिन्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे याना बंगल्यावर बोलवून मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते. मात्र या प्रकरणात मंत्री आव्हाड यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी किरीट सोमय्या यांनी मंत्री आव्हाड यांना अटक करण्यात आल्याचे ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. “अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!