तुम्हीच दुर्गादेवी… आरोग्य सेविकांचा असाही सन्मान !

कुणाल मांजरेकर

मालवण : कोविड काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य सेविका ह्याच खऱ्या दुर्गादेवी आहेत. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने मालवणात होणाऱ्या प्रभागनिहाय लसीकरणाच्या निमित्ताने या आरोग्य सेविकांचा नगरसेवक यतीन खोत यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला. “दुर्गादेवीचे तुम्ही वेगळे रूपे आहात” अशा शब्दांत आरोग्य खात्यातील या दुर्गादेवींचा सन्मान करण्यात आला.

मालवण शहरातील प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांसाठी येथील टोपीवाला हायस्कूल याठिकाणी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी कोरोना प्रतिबंधीत कोविडशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. यावेळी सुमारे ४४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दुर्गादेवीचे प्रतिरूप असलेल्या आरोग्य सेविकांचा यथोचित सन्मान केला. नगरसेवक यतीन खोत यांनी त्यांना भेटवस्तू देऊ सन्मानित केले. या वेळी नगरसेवक यतीन खोत, मनोज शिरोडकर, गणेश चिंदरकर, होमगार्ड मधू मालवणकर, सुरेखा वरक उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिका कर्मचारी पूजा बेग, मालवण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बालाजी पाटील, आरोग्यसेविका विद्या सावंत, समीक्षा खोत, मिलिंद चव्हाण, खोडके, कॊरडे आदींनी मेहनत घेतली. नगरसेवक यतीन खोत यांनी प्रभागातील नागरिकांचे आभार मानले.

मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती, नगरसेवक यतीन खोत यांनी नवरात्रीच्या निमित्ताने आरोग्य सेविकांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान केला.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!