मालवण समुद्रकिनारी उदया आर्मीच्या नियंत्रणाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन
मालवण : २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणारे एनसीसीचे ५८ महाराष्ट्र बटालियन आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा NCC (राष्ट्रीय छात्र सेना) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी या ठिकाणी उद्या शुक्रवारी २१ जुन रोजी सकाळी ७.३० वा. भव्य स्वरूपात योगा दिन साजरा करण्यात येणार आहे. हा योग दिवस साजरा करण्यासाठी भारत सरकारचे आर्मीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम आणि इतर आर्मी ऑफिसर उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम आर्मीच्या नियंत्रणाखाली घेण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय योगा दिन समुद्र किनारी साजरा करणारे मालवण शहर महाराष्ट्रात आणि देशात एक वेगळेपण दाखवणारे आहे, मालवण शहराची एक वेगळी ओळख या निमित्ताने होणार आहे. या ठिकाणचे सर्व फोटो भारतीय सैन्य दलाच्या दिल्ली मुख्य कार्यालयाला पाठवण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उद्या सकाळी ७.३० वा. नवीन मालवण बंदर जेटी येथे उपस्थित रहावे. योगासाठी साधारणत: पांढरा टी-शर्ट आणि ब्लॅक पँट असा असेल तर अगदी उत्तम नसेल तरीही आपल्याला जो शोभेल असा आणि योगा करता येईल असा आपला पेहराव असावा. तरी मालवण मधील व मालवण परिसरातील सर्व शाळांचे विद्यार्थी, संस्था पदाधिकारी, पत्रकार, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, महिला बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, योगा ग्रुप, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले आहे.