राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या औचित्यावर महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन

मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा उपक्रम ; राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी घालणार साकडे

मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या माध्यमातून महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन घडवण्यात येणार आहे. पुढील महिन्यात या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेला घवघवीत यश मिळून राज ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना स्वामी चरणी करण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीत २० महिलांना मोफत दर्शन घडणार आहे. दरवर्षी अश्या प्रकारे मोफत देवदर्शन सहलीचे नियोजन मनसेच्या वतीने केले जाईल, अशी माहिती गणेश वाईरकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!