तळाशील येथील चोडणेकर कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली भेट 

तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने किशोर चोडणेकर चार दिवसांपासून बेपत्ता ; शोधमोहिमेचा निलेश राणे यांनी घेतला आढावा

मालवण : तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर या मच्छिमाराच्या कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेत त्यांना धीर दिला. बेपत्ता मच्छिमाराच्या शोधासाठी प्रशासनाकडून सूरू असलेल्या शोधमोहिमेचा आढावाही निलेश राणे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून घेतला. 

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, संजय तारी, अण्णा कोचरेकर यांसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय -५५) हे मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय – १४) वर्षे आणि खालशी धोंडीराज परब (वय ५५ वर्षे) रा. तारकर्ली यांसह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन शनिवारी रात्री मासेमारीसाठी गेले होते. यावेळी अचानक वाढलेल्या वाऱ्या व पावसात होडी उलटली. तीनही जण पाण्यात बुडाले. लावण्य हा पोहून बाहेर आला आणि बचावला. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह रविवारी सापडला. मात्र किशोर यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यांचा शोध ग्रामस्थ, प्रशासनान व शोध पथकाच्या माध्यमातून सूरू आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!