आर्थिक व्यवहारातून मारहाण करून बळजबरीने दुचाकी ताब्यात घेतल्याप्रकरणी आरोपीची सशर्त जामीनावर मुक्तता
आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई आणि ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले
मालवण : हडी येथील कालिका मंदिराजवळ फिर्यादीस आर्थिक व्यवहाराच्या वादातून मारहाण करून फिर्यादीच्या ताब्यातील दुचाकी बळजबरीने काढून घेतल्याबाबत दाखल गुन्ह्यामधील आरोपी विनायक परशुराम पराडकर (वय 49 रा. धुरीवाडा मालवण) याची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी रक्कम रु 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
याकामी फिर्यादीने मालवण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध भा. दं. वि. कलम 394, 420, ,507,506, 34 अन्वये जबरी चोरीचा व फसवणुकीचा गुन्हा दि. 01/06/2024 रोजी रात्री 8. 58 मिनिटानी दाखल करण्यात आला होता. यावरुन आरोपीस अटक करून मे. न्यायालयात दि. 02/06/2024 रोजी हजर केले असता मे. न्यायालयाने तपासकामाकरीता आरोपीस दि. 06/06/2024 रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दि. 06/06/2024 रोजी आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आरोपीतर्फे मे. मालवण न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीअंती दि. 07/06/2024 रोजी मे. मालवण न्यायालयाने आरोपीची रक्कम रु. 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.