दांडी बूथ क्र. १०५ मध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ; भाजपा मालवण महिला शहरअध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण : भाजपा महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मालवण शहर दांडी परिसरात बूथ क्रमांक १०५ याठिकाणी भाजपाच्या महिला आघाडी शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर व अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारफेरी माध्यमातून घरोघर प्रचार करण्यात आला. या प्रचारा दरम्यान राणे साहेबाना सर्वच ठिकाणी जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे. जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास सौ. आचरेकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.