अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली घोषणा

कुणाल मांजरेकर

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली आहे.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. यामध्ये जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे. ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल, असेही राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!