खा. विनायक राऊत यांच्या रविवारी २१ एप्रिलला मालवण तालुक्यात जाहीर प्रचार सभा
आचरा, पोईप, कट्टा, तारकर्ली काळेथर येथे आयोजन ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या रविवारी २१ एप्रिल रोजी मालवण तालुक्यात जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. आचरा, पोईप, कट्टा, तारकर्ली काळेथर येथे या सभांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते तथा कोल्हापूर-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपनेते गौरीशंकर खोत, लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, उपनेते तथा महिला जिल्हा संघटक सौ. जान्हवी सावंत, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगांवकर, ठाकरे गट युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा युवतीसेना जिल्हा विस्तारक कु. रुची राऊत, ठाकरे गट युवासेना विस्तारक गितेश राऊत, जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत या जाहीर प्रचार सभा होणार आहेत.
याठिकाणी होणार जाहीर प्रचार सभा
आचरा विभाग- वेळ- सकाळी ठिक ११ वा. स्थळ- आचरा तिठा, पोईप विभाग- वेळ- दुपारी ठिक ३.३० वा. स्थळ- पोईप तिठा, पेंडुर विभाग- वेळ- संध्याकाळी ६ वा. स्थळ- कट्टा बाजारपेठ, देवबाग विभाग- वेळ- रात्री ८ वा. स्थळ-तारकर्ली काळेथर(डोबातील मैदान)
तरी इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, शिवसेना ठाकरे गट, युवासेना – युवतीसेना पदाधिकारी, महिला आघाडी, ठाकरे गट शिवसैनिक-युवासैनिक, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.