केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले कांदळगाव श्री देव रामेश्वराचे दर्शन
मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुती कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सपत्नीक कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथे देव रामेश्वराचे दर्शन घेत पूजन केले. दरम्यान, मोठ्या मताधिक्याने राणेसाहेब विजयी व्हावेत. श्री देव रामेश्वर मंदिरात महारुद्र व महाप्रसादाचे आयोजन करू, अशा स्वरूपात भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी रामेश्वर चरणी साकडे घातले.
यावेळी सौं. निलमताई राणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, राजन वराडकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, अंजली लिलाधर पराडकर व सहकारी , महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, विकी तोरसकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, जॉन नरोना, नारायण धुरी, संतोष पालव, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, शामा मुळये, संतोष पारकर, आबा साळकर, उमेश कोदे, भाऊ गुरव, संजय परब, मधुसूदन परब, विशाल राणे, अमोल वारंग, संतोष मुसळे, आबा साळकर, शारदा मुळये, संजना परब, भाग्यश्री डिचवलकर, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, संग्राम साळसकर, ललित चव्हाण, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर, राजु बिडये, रवी मालवणकर, विहार कोदे, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, संजय कदम, यशा मालंडकर, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.