मालवण धुरीवाड्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक ; स्वामी भक्तांची मोठी उपस्थिती
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आणि प्रकट दिनानिमित्त आयोजन ; भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि राणेप्रेमी कार्यकर्त्यांकडून धुरीवाडा कुरण येथील स्वामी समर्थ मठात स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक आणि ब्राम्हण भोजन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महा आरती करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजू बिडये, भाई मांजरेकर, बाबू धुरी, प्रमोद करलकर, प्रशांत बिरमोळे, नाना साईल, निकित वराडकर, निनाद बादेकर, मयू पारकर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा पूजा करलकर, चारुशीला आचरेकर, ममता वराडकर, पूजा वेरलकर, राणी पराडकर, रसिका मयेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वामी भक्त नागरिक उपस्थित होते.