जिल्हा बँकेचे एक कोटींचे कर्ज थकवणाऱ्या सहकारी कारखान्याला कोल्हापूरच्या सहकार न्यायालयाचा दणका

सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखान्याच्या अध्यक्ष, संचालकांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई

सिंधुनगरी : सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित सिंधुदुर्ग पडवे, माजगाव तालुका-दोडामार्ग या कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने काजू बी खरेदी व प्रक्रियेसाठी एक कोटी कर्ज दिले होते. सदरचे कर्ज थकीत झाल्याने बँकेने संस्थेवर महाराष्ट्र सहकार कायदा कलम ९१ नुसार २८/१२/२०२३ रोजी सहकार न्यायालय क्र. २ कोल्हापूर येथे बँक कर्ज वसुलीसाठी दावा दाखल केला होता. या दाव्यापोटी न्यायालयाने २६ मार्च २०२४ रोजी अंतरिम आदेश निर्गमित केला आहे. यात संस्थेची मालमत्ता तसेच संस्था अध्यक्ष चंद्रशेखर अर्जुन देसाई व अन्य संचालक यांच्या नावे असलेली वैयक्तिक मालमत्ता विक्री अगर हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केलेला आहे. या कामी बँकेच्या वतीने अँड. अमोल पाटील, कोल्हापूर यांनी कामकाज केलेले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!