मसुरे डांगमोडे येथे रंगणार भव्य जिल्हास्तरीय निमंत्रित संघांची कबड्डी स्पर्धा
महिला आणि पुरुष संघाना संधी, २९ मार्च रोजी आयोजन ; विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर भव्य स्मृती चषक
मालवण : सिंधुदूर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने मसुरे-डांगमोडे रवळनाथ मंदिर येथील श्रीदेवी भवानी वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त २९ मार्च रोजी जिल्हास्तरीय पुरुष व महिला निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन डांगमोडे रवळनाथ मंदिर नजीक करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम परितोषिक रोख रू 5000, द्वितीय पारितोषिक रोख रू. 3000, तृतीय पारितोषिक रोख रू.1500 आणि चतुर्थ परितोषिक रोख रू. 1500 व कै. शिवाजी गंगाराम ठाकूर स्मृती चषक देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेमधील उत्कृष्ट चढाई, क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट खेळाडू यांना रोख रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येईल. स्पर्धा रात्री ठीक ७ वाजता सुरू होणार असून स्पर्धेत सहभागी सर्व संघांच्या खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघानी आपली नावे नितीन हडकर मो. ७२४९३५७२३९ किवा दत्तप्रसाद पेडणेकर मसुरे मो. ९३७३८५५६४३ येथे संपर्क साधावा असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे..