मालवण बौद्धवाडीतील युवा कार्यकर्त्यांचा निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सौरभ ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश ; प्रवेशकर्त्यांमध्ये रोहन पेंडूरकर व सहकाऱ्यांचा समावेश 

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरातील एस टी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

प्रवेशकर्त्यांमध्ये रोहन पेंडूरकर, नितेश पेंडूरकर, महेश मालवणकर, नागेश मालवणकर, सचिन मालवणकर, परेश मालवणकर, भरत मालवणकर, नितेश मालवणकर, सिद्धार्थ मालवणकर, राहुल पेंडूरकर, वैभव मालवणकर, गुणेश हडकर, सिद्धांत देऊलकर , विश्वास आचरेकर, शैलेश मलये, मंजित नार्वेकर, किशोर मालवणकर, राजा कांबळी, रवींद्र मालवणकर, दिनेश चव्हाण, तोषक केळूसकर, कैलास मेस्त्री, सुनील देऊलकर, अमित जाधव, चंदन जाधव, हेमंत वायगणकर यांचा समावेश आहे. या सर्वांचे निलेश राणे यांनी पक्षात स्वागत करून समाजोपयोगी कामात नेहमीच आपले सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. यावेळी भाजप युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!