सिंधुदुर्ग बँकेच्या मालवण शाखेचा मंगळवारी १२ मार्चला स्थलांतर सोहळा
भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन ; बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालवण कार्यालयाचा स्थलांतर सोहळा मंगळवारी १२ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मालवण कार्यालय बाजारपेठेतील बाणावलीकर हेरिटेज येथे स्थलांतरीत होत आहे. याचा शुभारंभ मंगळवारी १२ मार्च रोजी होत आहे. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व्हिक्टर डान्टस, संदीप उर्फ बाबा परब, मेघनाद धुरी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, हडी सरपंच प्रकाश तोंडावळकर, कांदळगाव सरपंच रणजित परब, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, श्री कालिकादेवी वि. का. स. सेवा सोसा. लि. हडी अध्यक्ष सच्चिदानंद गोलतकर, कांदळगाव वि. का. स. सेवा सोसा. लि. कांदळगाव अध्यक्ष प्रसाद भोगले, अध्यक्ष, रयतवायरी वि. का. स. सेवा सोसा. लि. वायरी अध्यक्ष हरीश गांवकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व सर्व संचालक मंडळाने केले आहे.