ओवळीयेमध्ये उभे राहतेय जिल्ह्यातील पहिले “नक्षत्र व नवग्रह उद्यान” ; दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमीपूजन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा ; ओवळीये केळीचीवाडी रस्ता डांबरीकरणाचाही शुभारंभ

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील ओवळीये रामेश्वर मंदिर परिसरात राज्य शासनाच्या यात्रा स्थळ सुशोभीकरण निधीतून नक्षत्र व नवग्रह उद्यान साकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हे पहिले उद्यान आहे. याठिकाणी नवग्रहाची झाडे लावण्यात येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून हे मंजूर करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते रविवारी याचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, आनंद शिरवलकर, माजी जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, मकरंद राणे, भाजपा विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, सरपंच रघुनाथ धुरी, गावप्रमुख दादा परब, बबन परब, बाळा सावंत, रवींद्र गावकर, अच्युत गावकर, अवी गावकर, गणेश गावकर, सदानंद निर्गुण, धनंजय निर्गुण, संदीप सावंत, गणेश हिर्लेकर, महेश तावडे, संतोष कदम, सुभाष सावंत, समीर सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या ओवळीये केळीचीवाडी रस्ता डांबरीकरणाचाही शुभारंभ यावेळी दत्ता सामंत यांच्याहस्ते करण्यात आला. या कामासाठी देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी पाठपुरावा केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!