महिला दिनाचे औचित्य साधून ठाकरे शिवसेनेकडून मालवणात मत्स्य, भाजी विक्रेत्यांचा सन्मान

मालवण : ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणात शनिवारी सकाळी मच्छिविक्रेत्या आणि भाजी विक्रेत्या महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महिला उपजिल्हाप्रमुख सेजल परब, रश्मी परुळेकर, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख शिल्पा खोत, नंदा सारंग, आकांक्षा शिरपुटे, लक्ष्मी पेडणेकर, सौ. आश्विनी आचरेकर, सौ. विद्या फर्नांडीस, श्रीमती नीना मुंबरकर, सौ. निनाक्षी मेथर, सौ. सोनाली शिरोडकर, सौ. माधुरी प्रभू, सौ. अंजना सामंत यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, सन्मेष परब, दीपक देसाई, अक्षय भोसले, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, तपस्वी मयेकर, करण खडपे तसेच अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!