“वैकुंठ रथ” मालवण वासियांच्या सेवेत ; भाजपा नेते निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण
भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या पुढाकाराने श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्टमार्फत उपक्रम
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पार्टी मार्फत माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्टमार्फत नागरिकांच्या सेवेत वैकुंठ रथ देण्यात आला आहे. या वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा मामा वरेरकर नाट्यगृहाच्या परिसरात भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा खरेदी विक्री संघाचे संचालक आबा हडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, विलास हडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, चिटणीस निशय पालेकर, नारायण लुडबे, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर, विक्रांत नाईक, अखिलेश शिंदे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शहर वासियांच्या सेवेत यापूर्वी आपण शवपेटी दिली होती. आता माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा वैकुंठ रथ दिला असून यानिमित्ताने माझ्या हातून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न असल्याचे गणेश कुशे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर भाजपच्या कार्यालयात निलेश राणे यांच्या उपस्थितीत गणेश कुशे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.