भाजपातर्फे मालवणवासियांच्या सेवेत “वैकुंठ रथ” ; आज लोकार्पण सोहळा 

भाजपा नेते निलेश राणे, डॉ. सुभाष दिघे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : भारतीय जनता पार्टी मार्फत माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्टमार्फत नागरिकांच्या सेवेत वैकुंठ रथ देण्यात आला आहे. या वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा आज दुपारी १२ वाजता भाजपा मालवण कार्यालयात मालवण कुडाळ विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे आणि डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते होणार आहे.

तरी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सर्व आघाडीचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!