मनसेला मालवणात पुन्हा धक्का ; मनविसे तालुकाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

परशुराम उपरकर जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठींबा : संदीप लाड, प्राजक्ता पार्टे तसेच पदाधिकाऱ्यांची भूमिका 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यासह जिल्ह्यात मनसेला लागलेली गळती कायम आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड, महिला तालुकाध्यक्ष प्राजक्ता पार्टे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. आगामी काळात आमचे नेते परशुराम उर्फ जीजी उपरकर जो निर्णय घेतील, त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यामध्ये मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड, महिला तालुकाध्यक्षा प्राजक्ता पार्ट-आढाव, भागेश्री लाकडे, कुणाल चोडणेकर, तुषार जुवेकर, कुणाल धुरत, सिद्धेश घोगळे, अविनाश आचरेकर, रेणुका लाड, मृणाली शिंदे यांचा समावेश आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!