मालवण पुणे मार्गावर उद्यापासून विना वातानुकुलित शयनयान तर मालवण – मुंबई मार्गावर वातानुकुलित शिवशाही

मालवण आगाराप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती

मालवण : मालवण एसटी आगारातून सुटणाऱ्या बसेस मध्ये उद्यापासून ( मंगळवार दि. १३ फेब्रुवारी) बदल करण्यात आलेला आहे. उद्यापासून सकाळी सुटणारी ८ वाजताची मालवण मुंबई ही फेरी साधी ऐवजी वातानुकुलित शिवशाही चालविण्यात येणार आहे. तर उद्यापासून संध्याकाळी सुटणारी १६.४५ वाजताची मालवण पुणे निगडी ही फेरी शिवशाही ऐवजी विना वातानुकुलित शयनयान चालविण्यात येणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!