मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त जागांप्रश्नी ठाकरे गट आक्रमक

डॉक्टर नियुक्त करण्याची कार्यवाही सूरू ; सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांची माहिती 

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयातील रिक्त डॉक्टर प्रश्नी ठाकरे गट पदाधिकारी सोमवारी आक्रमक बनले. रुग्णालयात आलेल्या सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांची भेट घेत तात्काळ डॉक्टर नियुक्त करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली.

सर्वासामान्य रुग्णांचा प्राण असलेल्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध असलेच पाहिजेत. रिक्त जागी तात्काळ डॉक्टर नियुक्ती बाबत निर्णय घ्या अशी मागणी करण्यात आली. यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील म्हणाले, मालवण ग्रामीण रुग्णालयात पर्यायी स्वरूपात डॉक्टर नियुक्त केले जातील. तसेच शासन स्तरावर ही भरती प्रक्रिया सूरू आहे. लवकरच त्या माध्यमातूनही डॉक्टर उपलब्ध होतील. रुग्ण सेवेवर परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. असे डॉ. पाटील यांच्या वतीने सांगण्यात आले. रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर हे ही उपस्थित होते. 

यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, तालुका समन्वयक पूनम चव्हण, जयमाला मयेकर, तपस्वी मयेकर, संमेश परब, नरेश हुले, उमेश मांजरेकर, हेमंत मोंडकर, बंड्या सरमळकर, दत्ता पोईपकर आदी ठाकरे गट पदाधिकारी उपस्थित होते. मालवण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद प्रभारी पदभार आहे. तर 3 वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) डॉ. पैकी काही रिक्त आहेत. तर 7 फेब्रुवारीला सेवाकाळ समाप्त झाल्या नंतर एकही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे रिक्त जागी डॉक्टर नियुक्ती तात्काळ झाली पाहिजे. सर्वासामान्य रुग्णांचा प्राण असलेल्या ग्रामीण रुग्णालयात  डॉक्टर नियुक्त असलेच पाहिजेत अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. महेश जावकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, जयमाला मयेकर, तपस्वी मयेकर यांनी आक्रमक भूमिका मांडली. रुग्णालयात डॉक्टर कर्माचीरी ही पदे रिक्त राहिल्यास त्याचा रुग्ण सेवेवर परिणाम होतो. त्यामुळे ही पदे भरणा करून आवश्यक आरोग्य सेवाही उपलब्ध झाल्या पाहिजेत अशी मागणी करण्यात आली. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!