आई भराडी… दडपशाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची शक्ती दे !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आंगणेवाडीत साकडे ; विजय मिळाल्यानंतर वाजत गाजत दर्शनाला पुन्हा येणार

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आंगणेवाडीत श्री देवी भराडीचे दर्शन घेतले. यावेळी दडपशाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची आम्हाला शक्ती दे, असे देवीला साकडे घालून महाराष्ट्राच्या तख्तावर विजय मिळवल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन वाजत गाजत देवीच्या दर्शनाला येणार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपर्क अभियानानिमित्त आले असून रविवारी संध्याकाळी उशिरा त्यांनी आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्यासाठी गाऱ्हाणे  घालून त्यांना सुयश लाभण्यासाठी देवीकडे मागणे मागितले. यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या वतीने ठाकरे गटाच्या एल अँड टी युनिटच्या सुधाकर आंगणे यांनी उद्धव ठाकरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच आंगणेवाडीतील युवकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक पुष्पहार घालून हृदय सत्कार करण्यात आला. तसेच मसूरे विभागाच्या वतीनेही उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. रश्मीताई ठाकरे, विशाखा  राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख संजय पडते, शशिकांत आगणे, अर्जुन आंगणे, सुनील आंगणे, मुंबई माजी नगरसेवक सदा परब, माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, संदीप हडकर, राजेश गावकर, सुहास पेडणेकर, पंकज वर्दम, अमित भोगले, दिनेश परब, सुरेखा वायंगणकर, नरेश सावंत, राघवेंद्र मुळीक, रिया आंगणे, मामा पेडणेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आबा आंगणे, जयवंत आंगणे, तुषार आगणे, तनुराज आंगणे, प्रथमेश आंगणे, सुभाष आंगणे, पंकज आंगणे, सचिन आंगणे, देवेंद्र आंगणे, प्रतीक आंगणे, गणेश आंगणे, संतोष आगणे, प्रसाद आंगणे, चंद्रशेखर आंगणे, समीर आगणे, नंदकुमार आंगणे, श्रीकृष्ण आगणे, सुभाष आंगणे, प्रसाद आंगणे, तनुराज आंगणे गौरेश आंगणे, बाबू आंगणे, विठ्ठल आगणे, रामदास आंगणे, केशव आंगणे, आयवान फर्नांडिस, विजय पालव, सतीश आंगणे, राहुल सावंत, मामा पेडणेकर, राजू मालवणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी, आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!