चक्कर येऊन पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

कोळंब पुलावरील दुर्घटना

मालवण : कोळंब येथून पुतणीच्या स्कुटर वरून मालवणकडे येताना चक्कर येऊन खाली पडल्याने श्रीमती अनिता अनिल फाटक (वय ६६, रा. मुंबई) या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १ वाजता कोळंब पुलावर घडली. 

सदरील महिला मुंबई येथे वास्तव्याला होती. कोळंब येथील मूळ घरी ती आली होती. दुपारी पुतणीच्या स्कुटरने मालवणकडे येत असताना कोळंब पुलावर चक्कर येऊन पडल्याने गंभीर जखमी अवस्थेत तिला मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. याबाबत सुनील फाटक यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!