शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९८ वी जयंती मालवणात ९८ उपक्रमांनी साजरी करणार
आठवडाभर सुरु राहणार उपक्रम ; १८ जानेवारीला मामा वरेरकर नाट्यगृहातील रक्तदान शिबिराने सुरुवात
रक्तदान शिबीरासह सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती
मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९८ वी जयंती २३ जानेवारी रोजी साजरी होत आहे. या निमित्त मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यात ९८ सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबवले जाणार आहेत.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कार्यक्रमांची सुरुवात मालवण येथे रक्तदान शिबिराने केली जाणार आहे. मालवण येथील लीलाधर पराडकर व आतु फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मालवण यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर मामा वरेरकर नाट्यगृह येथे १८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तरी शिवसैनिक व रक्तदाते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी यांनी केले आहे.