नांदोस गावात एकाचवेळी ८० कलावंतांचा सत्कार ; दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
शिवलीला मित्रमंडळाचा उपक्रम ; मंडळाच्या उपक्रमाचे श्री. सामंत यांनी केले कौतुक
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील नांदोस गावात मागील बारा वर्षे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविणाऱ्या शिवलीला मित्रमंडळाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच नांदोस गावातील भजनी कलावंत, तबला वादक, मृदुंगमणी वादक तसेच लहान मुलांचा (शास्त्रीय संगीत नवोदित कलाकार) मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांची उपस्थिती होती. त्यांनी शिवलीला मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमात गावातील नामांकित बुजुर्ग भजनी कलावंत गणेश गावडे बुवा, गणेश पार्ट्टे, आनंद करावडे, हरिश्चंद्र माळकर, मृदुंगमणी रुपेश परब, नंदू करावडे, विद्याधर पार्टे, व त्यांचे शिष्यगण असे मिळून ८० कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत श्री देव गिरोबाच्या भव्य रंगमंचावर सन्मान करण्यात आला. तसेच क्रीडा व सांस्कृतिक शेत्रात उलेखनिय यश संपादन केलेल्यांचा देखील सन्मान मंडळाचे अध्यक्ष शैलेश बिबवणेकर, सचिन गावडे, हेमंत माळकर, देऊ ढोलम व सर्व सभासदांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह माजी जि. प. सदस्य अनिल कांदळकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, दादा नाईक, छोटू ठाकूर, पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे, राजू बिडये, ग्रामपंचायत सदस्य बीजेंद्र गावडे, सागर नांदोसकर, सौ.ऋतुजा हेमंत माळकर, सौ.वैशाली घाडीगावकर, सौ.कोमल कदम गावडे, सौ.ज्योती पेडणेकर, सौ. गौरी पारकर, सौ. मीनल पार्टे, सौ. संजना गावडे, सौ. शिल्पा शैलेश बिबवणेकर, सौ.ढोलम, सौ.नमिता नितीन नांदोसकर, सौ.सिध्दीका कदम, ग्रामसेवक सुशांत चौगले, पोलिस पाटील सूर्यकांत काळसेकर, यशवंत चव्हाण, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र गावडे, परेश गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत माळकर, दुग्धविकास संस्था व श्री देव गिरोबा डेअरी फार्मचे सभासद मारुती चव्हाण, रमेश नांदोसकर, अनिल पार्टे, बाळ गावडे, सुभाष गावडे, दिपक गावडे, अरविंद गावडे, प्रकाश गावडे, सर्व आजी माजी पदाधिकारी व नांदोस ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक हेमंत माळकर यांनी केले. तर राजा सामंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. रात्रौ नितीन अशियेकर श्री देवी भूमिका लोककला नाट्यमंडळ सावंतवाडी यांचा नाट्यप्रयोग होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.