भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पावशी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ
पावशी सरपंच सौ. वैशाली पावसकर व शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष बंटी तुळसकर यांची उपस्थिती
कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून पावशी येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी पावशी येथे पार पडला. यावेळी चव्हाणवाडी गोसावीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणं करणे-७ लक्ष, पावशी सातेरी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-५ लक्ष तर तेली कुळाचार मंदिर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-५ लक्ष या विकासकामांचा शुभारंभ निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी पावशी गावच्या सरपंच सौ. वैशाली पावसकर व शिवसेना (शिंदेगट) तालुकाध्यक्ष बंटी तुळसकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. पावशी सातेरी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ करण्याचा मान निलेश राणे यांनी पावशी सरपंच वैशाली पावसकर यांना दिला. यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, पप्या तवटे, दीपक नारकर, निलेश तेंडुलकर, दिपलक्ष्मी पडते, ओंकार तेली, विनायक राणे, निलेश परब, प्रकाश पावसकर, वृनाल कुंभार, बाळा कोरगावकर आदी उपस्थित होते.