तेंडोलीतील क्रिकेट स्पर्धेचे भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते उदघाटन 

मालवण : तेंडोली गावठणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री देव महापुरुष चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह भाऊ पोतकर, मंगेश प्रभू, रामचंद्र राऊळ, प्रताप राऊळ, नारायण राऊळ, बाळा परब, नितीन सर्वेकर, बंटी पाटकर, केतन राऊळ, हरिश्चन्द्र राऊळ, उमेश राऊळ, विष्णू तेंडोलकर,, रोहित खानोलकर, रोशन कुंभार, नितीन राऊळ, कृष्णा राऊळ, मुन्ना साळसकर, शेखर राऊळ, गजानन खानोलकर, सुनिल सातार्डेकर व महापुरुष क्रीडा मंडळचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी केक कापून दत्ता सामंत यांचा वाढदिवस साजरा केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!