भाजपा एनजीओ सेलच्या जिल्हा संयोजकपदी भालचंद्र राऊत यांची नियुक्ती

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची भाजपा नेतृत्वाने घेतली  दखल

मालवण : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून सदर कार्यकारिणीमध्ये श्री भालचंद्र सुभाषचंद्र राऊत यांची सेवाभावी संस्था (एनजीओ) सेलच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हा बँक संचालक तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र राऊत यांना देत त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

भालचंद्र राऊत हे मागील अनेक वर्षे विविध सामाजिक संस्थांशी संलग्न आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमधून त्यांचा सक्रीय सहभाग असतो. संपुर्ण कोकणात अनेक संस्था, संघटनाना एकत्रित करण्याचे काम मागील काही कालावधीत त्यांनी कोकण एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी केले असून फेडरेशनचे ते कार्याध्यक्ष म्हणून काम बघत आहेत. नुकतेच कुडाळ येथे त्यांनी विविध एनजीओंचे एकत्रिकरण करत भव्य एनजीओ समेट भरवला होता, ज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशेहुन अधिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यातील काही संस्थांना सोबत घेत गावपातळीवर अर्थकारण सक्षम व्हावे, पर्यावरण समृद्ध गाव रहावे, कोकणमधील वैशिष्ट्यपूर्ण कोकण गिड्डी गाईंचा मूळ वंश संवर्धित रहावा यासाठी गोमय उत्पादन निर्मिती व विक्री शिबिरे भरवत त्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी, तसेच कोकणातील दर्जेदार मसाल्यांच्या उत्पादक महिला गटांना प्रोत्साहन देत त्यांची मसाला उत्पादने बाजारात आणण्यासाठी आघाडी घेतली आहे. तसेच सद्गुरू माऊली संप्रदायाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मदतीचा हात ठरला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एनजीओना त्यांचे कार्य व विविध उपक्रमात गती आणि शक्ती मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे एनजीओ सेलचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक भालचंद्र राऊत यांनी म्हंटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!