३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या कार्यालयाचे मालवणात उदघाटन

सर्व व्यापाऱ्यांच्या एकजुटीने मालवणात होणारा मेळावा यशस्वी करूया ; उमेश नेरूरकर यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथे ३१ जानेवारीला होणाऱ्या ३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यापारी मसउद मेमन यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सर्व व्यापा-यांच्या एकजुटीने मालवणात होणारा व्यापारी मेळावा यशस्वी करुया असे आवाहन मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी नितीन तायशेटे, महेश कांदळगावकर, मसउद मेमन, रविंद्र तळाशीलकर, गणेश प्रभुलकर, हर्षल बांदेकर, अभय कदम, संदिप शिरोडकर, भाऊ साळगावकर, सुहास ओरसकर, अरविंद सराफ, प्रविण लुडबे, प्रभाकर देउलकर, नाना साईल, भालचंद्र कवटकर, कैसर पठाण, सुहास आचरेकर, प्रसाद गाड, गोपाळ कारेकर, पुजा वाडकर, मुकेश बावकर, महादेव पाटकर, हिमांशु भगत, प्रमोद ओरसकर, दिपक बिरमोळे, सुशांत तायशेटे, सुमित कवटकर, अखिलेश शिंदे, करण खडपे, हरेश देउलकर आदी व्यापारी उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश प्रमुलकर यांनी केले.

व्यापारी महासंघाचा व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारी रोजी मालवण येथे होत असल्याने मोठ्या प्रमाणात व्यापारी महासंघ आणि मालवण व्यापारी संघातर्फे नियोजन करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे. महिला व्यापारी संघाची कार्यकारिणी निश्चीत करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय संस्थांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. जिल्हा बँक तसेच शहर व परिसरातील सर्व बँकांनाही व्यापारी महासंघाच्यावतीने भेट देऊन कार्यक्रमाची माहिती देण्यात आलेली आहे. मालवणचा मेळावा न भुतो न भविष्यती असा होण्यासाठी सर्व व्यापारी वर्ग कार्यरत झाले आहेत. युवा व्यापारी संघाचे पदाधिकारीही सर्वत्र सज्जतेने काम करत आहेत. संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनातून मालवण व्यापारी संघाकडून सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!