उदय दुखंडे पोपटपंची करणे आणि खोट्या अफवा पसरवण्यात माहीर

भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख दत्ता वराडकर यांचा पलटवार ; वैभव नाईकांना आमदार फंड सोडून दुसरा निधी देण्याचा अधिकारच राहिलेला नसल्याची प्रतिक्रिया

मालवण | कुणाल मांजरेकर

पंचायत समितीत असताना ठराव कसा मांडायचा याची समज नसलेले उदय दुखंडे आज विकास कामांच्या वर्कऑर्डरवर बोलतात, हा मोठा विनोद आहे. ते एक कुप मंडूक असून प्रशासनात काम कशा पद्धतीने होते, याबाबत ते अज्ञानी आहेत. एखाद्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली की ते काम शासन दप्तरी मंजूर असते एवढीही समज त्यांना राहिलेली नाही. केवळ पोपटपंची करणे आणि खोट्या अफवा पसरवण्यात ते माहीर असून चिंदर गावातील विकास कामे आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाल्याचे चुकीचे वक्तव्य त्यांनी केले आहे. विरोधी बाकांवर असलेल्या आ. नाईक यांना आता केवळ आमदार फंड वळगता अन्य कोणताही फंड देण्याचा अधिकारच राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे शक्तिकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर यांनी देत उदय दुखंडे यांच्यावर पलटवार केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे यांनी दीड महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या चिंदर गावातील विकास कामाना अद्यापही वर्क ऑर्डर नसल्याने ही कामे सुरु कधी होणार असा सवाल केला होता. तसेच ही कामे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचे म्हटले होते. याला दत्ता वराडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेत असताना तूम्ही कामे करु शकला नाही, तर तूम्ही विरोधात असताना कुठली कामे मंजूर करुन आणणार ? तुम्ही फक्त फुकाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करा. सत्ता असताना कुठल्या हेड खाली कुठली कामे करायची याचे ज्ञान तुमच्या आमदारांनाही नाही. त्यांनी पहिल्यांदा आमचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडून ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे. या जिल्ह्यात आता विकासात्मक कामे होतात याचं खरं श्रेय हे नारायणराव राणे, पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण आणि आमचे फायरब्रँड नेते निलेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या वर्कऑर्डर ह्या प्रोसिजर प्रमाणे होत आहेत. त्यामुळे चिंदरमध्ये फुकाचे श्रेय घेता आले नाही, याचं दुःख उबाठा वाल्यांना जास्तच झालेलं दिसतं आहे, असा टोला दत्ता वराडकर यांनी लगावला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!