निलेश राणेंच्या उपस्थितीत आडवण देऊळवाडा येथील नवीन आरसीसी मायनर ब्रीजचे भूमिपूजन
सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ४५ लाखांचा निधी ; माजी खा. निलेश राणे यांचा पाठपुरावा
मालवण : मालवण शहरातील आडवण देऊळवाडा येथील नवीन आरसीसी मायनर ब्रीजच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या ब्रीज कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी ४५ लाख पेक्षा जास्त निधी मंजूर करून दिला आहे, अशी माहिती स्थानिक माजी नगरसेविका तथा भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर यांनी दिली.
शासनाच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे मोठ्या प्रमाणात विकास निधी मालवण कुडाळ तालुक्यात आणत आहेत. मालवण शहरातही मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर झाली असल्याचे सौ. करलकर यांनी सांगितले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेविका पूजा करलकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, दीपक पाटकर, जगदीश गांवकर, पंकज सादये, प्रमोद करलकर, राजू बिडये, विक्रांत नाईक, अवी सामंत,भाजप महिला शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, युवा मोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, भाजप ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, महिमा मयेकर, शुभांगी ठुबरे, विशाखा पाटकर, दीपाली गोवेकर, साधना आकेरकर, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निशय पालयेकर यासह स्थानिक नागरिक लक्ष्मण करलकर, संदीप लुडबे, बाळा आचरेकर, दत्ता पाटकर, जयवंत चव्हाण, रामचंद्र करलकर, अक्षय माणगावकर, दिलीप नाईक, सुबोध केळूसकर, संजय वराडकर, दीपक जुवेकर, महिमा मयेकर, संजय आकेरकर, प्रमोद डिचोलकर, आकेरकर, आंब्रडकर यासह अन्य उपस्थित होते. नागरिकांच्या वतीने निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले.