दाऊदच्या हस्तका समवेत ठाकरे गटाच्या नेत्याची डान्सपार्टी ; आ. नितेश राणे यांच्या आरोपामुळे खळबळ
दाऊदचा हस्तक तथा १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता जेलमधून पॅरोलवर बाहेर असताना उबाठा नेता सुधाकर भडगुजर पार्ट्या करीत असल्याचा आरोप
आ. नितेश राणे यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनने उडवली खळबळ ; एसआयटी नेमून चौकशी करण्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नागपूर : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेचा नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हा डान्स पार्ट्या करतो. देशद्रोही असलेल्या आणि पॅरोलवर जेलमधून बाहेर असलेल्या सलीम कुत्ता सोबत हितसंबंध ठेवतो. या लोकांचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे. त्याचा शोध घ्यावा आणि सुधाकर भडगुजर याच्यावर अटकेची कारवाई करा. एसआयटी नेमून या प्रकरणातील प्रत्येकाची चौकशी व्हावी आणि देशद्रोह्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून विधानसभेत मांडत राज्यात एकाच खळबळ उडवून दिली आहे. या मागणीला सत्ताधारी महायुतीच्या मंत्री, आमदारांनी सेम सेम च्या घोषणा देत पाठिंबा दिला. दरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी च्या माध्यमातून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशा प्रकारची घोषणा केली.
आमदार नितेश राणे यांनी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत दिलेल्या माहिती खळबळ उडाली आहे. आमदार नितेश राणे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यात २५७ लोकांना मारले होते, तसेच ७०० लोकांना जखमी केले होते. सेनाभवन वर बॉम्बस्फोट करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर हे उठले होते. त्यांच्याशीच आज उबाठा सेनेचे नेते मैत्री करत आहे. या सलीम कुत्ताला कोण वाचवतो आहे याच्या संपर्कात कोण कोण लोक आहेत. अशा लोकांचा गॉड फादर कोण आहे.पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे तो शोधा. अशा लोकांमुळे आम्ही सुरक्षित नाही आहोत.असे आमदार नितेश राणे यांनी आक्रमकपणे सभागृहात मांडले.
दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मधील प्रत्येक वाक्य आणि वाक्याचे मंत्री दादा भुसे यांनी समर्थन दिले. सुधाकर भडगुजर हा कोणत्या माध्यमातून पैसे कमवतो. काही नसलेली व्यक्ती काही दिवसातच श्रीमंत कशी झाली.याची चौकशी झाली पाहिजे, देशावर हल्ले केले म्हणून अतिशय गंभीर गुन्हे असलेल्या देशद्रोही लोकांबरोबर संबंध ठेवणाऱ्यांची पुरावे नष्ट करण्यापूर्वीच अटक करा, अशी मागणी केली. तर आमदार आशिष शेलार यांनी पेग, पेंग्विन, पार्टीच्या दिशेने जात असताना आतंकवाद वाढत आहे. नाशिक मधील पार्टीची चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी केली. या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले.