एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य विशाल कुशे यांना स्टार एज्युकेशनचा अवॉर्ड जाहीर !

मालवण : सिंधुदुर्ग येथील एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य.विशाल कुशे यांना एज्युकेशन सप्लाय अँड फ्रॅंच्यजी एक्स्पो २०२३ यांच्या कडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ व्यवस्थापन प्रणाली या विभागातून अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. ही संस्था महाराष्ट्र शासन तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यासोबत संलग्न आहे.

प्रो. विशाल कुशे यांनी नेहमीच आपल्या कौशल्याने आणि आपल्या नेतृत्व शैलीने महाविद्यालयाच्या प्रगतीत योगदान दिले आहे. हा पुरस्कार आमदार प्रसाद लाड आणि एम.एफ.डी.सी. निधी चे अध्यक्ष फिरोज मसूलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात बुधवारी बी.के.सी – एम.एम.आर.डी.ए मैदान मुंबई येथे प्रदान करण्यात आला. उपप्राचार्य.विशाल कुशे यांच्या या यशाबद्दल एम.आय.टी.एम संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, प्राचार्य सूर्यकांत नवले यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारीवर्ग  यांनी अभिनंदन केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!