पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक !
राजकोट मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
मालवण | कुणाल मांजरेकर
नौसेना दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमरी वेषातील भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक झाले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. भारतीय नौसेनेने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौसेनेच्या वतीने ४ डिसेंबरचा नौसेना दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्ग च्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौसेना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.