पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी ; बोर्डिंग मैदानावर भव्य स्वागताचा कार्यक्रम
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नियोजन ; बोर्डिंग मैदानावर कार्यकर्ते, चाहत्यानी एकत्र होण्याचे आवाहन
पंतप्रधान काही क्षण थांबणार : स्वागताचा सोहळा ठरणार लक्षवेधी
मालवण | कुणाल मांजरेकर
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच नौदल दिनानिमित्त मालवणात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मालवण दौऱ्याबाबत कार्यकर्ते आणि जनते मध्ये प्रचंड उत्सुकता असून सुरक्षेच्या कारणामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्यात अनेकांना सहभागी होता येत नसल्याची उणीव पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरून काढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरण्याच्या ठिकाणी बोर्डिंग मैदानावर त्यांना जवळून भेटण्याची संधी ना. चव्हाण यांनी उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पंतप्रधान मोदी काही काळ थांबून कार्यकर्ते आणि जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
किल्ले राजकोट येथे उभारणी करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि तारकर्ली येथील नौसेना दिन सोहळा यात सहभागी होण्यासाठी भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे हॅलीकॉप्टरने दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टोपीवाला बोर्डिंग मैदान येथील जय गणेश इंग्लिश स्कूल मार्ग येथून नियोजित कार्यक्रम स्थळी जाणार आहेत. तरी पंतप्रधान यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. दुपारी १ वाजेपर्यंत मामा वरेरकर नाट्यगृहाच्या शेजारील मार्गाने तसेच भरड या मार्गे सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भाजप व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. अशी माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
.