अपघातात मयत झालेल्या दिनेश वेरलकर कुटुंबाला माजी खासदार निलेश राणे यांची आर्थिक मदत
आजारी मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही
मसुरे : ओरोस येथे काही दिवसापूर्वी झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात उपचारादरम्यान मयत झालेल्या मालवण तालुक्यातील वेरळ गावातील दिनेश वेरलकर या ग्रामस्थाच्या राहत्या घरी जाऊन माजी खासदार निलेश राणे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन या कुटुंबाला धीर दिला. तसेच या कुटुंबाला तातडीने रोख रुपयांची मदत देऊन दिनेश वेरलकर यांच्या आजारी मुलाच्या पुढील उपचारासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.
ज्या ज्या वेळी एखाद्या कुटुंबावरती प्रसंग ओढवतो तेव्हा माजी खासदार निलेश राणे हे धावून जातात. यावेळी सुद्धा निलेश राणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मृत पावलेल्या दिनेश वेरलकर या कुटुंबाला खऱ्या अर्थाने मानसिक आधार देऊन रोख रकमेची मदतही केली. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, भाजप मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, महेश बागवे, वेरळ सरपंच धनंजय परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, संतोष पालव, पुरुषोत्तम शिंगरे, अनंत भोगले, बाळा मेस्त्री, महेश मांजरेकर, जितेंद्र परब, यशवंत हिंदळेकर, कैतान लोबो,शिवाजी परब, जगदीश चव्हाण, श्री सावंत, लवू वेतलकर, सदाशिव परब, श्री मुणगेकर, दत्ताराम परब, चेतन वेलकर, रघुनाथ परब, नामदेव परब, कालिदास वेरलकर, किरण पाटील, योगेश बागवे, भागेश परब,अनिल परब आणि वेरली ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार निलेश राणे यांचे वेरलकर परिवाराने ऋण व्यक्त केले.