भाजपा नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या प्रयत्नांना यश ; फळपीक विमा नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढली

मालवण : फळपीक विमा नोंदणीची मुदत राज्य शासनाने वाढवली असून ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबर पर्यंत ही मुदत करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजपा नेते निलेश राणे यांची भेट घेत सर्व्हर डाऊन व इतर कारणांमुळे फळपीक विमा भरू शकत नसल्याची माहिती दिली होती. ३० नोव्हेंबर शेवटची तारीख असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले होते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण येथे आले असता भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्याशी चर्चा करत ही मुदत १५ दिवसांनी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी सचिवांना तत्काळ निर्देश देत ही मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढवून दिली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा भरलेला नाही त्यांनी तत्काळ पीक विमा भरण्याचे आवाहन भाजपा नेते निलेश राणे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!