रेवंडी येथे रस्ता डांबरीकरण कामाचा दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजुरी
मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या मधली रेवंडी येथील महापुरुष पार ते मुणगेकर घर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रविवारी करण्यात आला.
श्री देवी भद्रकाली जत्रेपूर्वी येथील खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत होती ही मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी सरपंच प्रिया कांबळी, माजी सरपंच युवराज कांबळी, माजी सभापती सोनाली कोदे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, संदीप मालंडकर, राजू बिडये, भाई मांजरेकर, विजय कांबळी, प्रकाश कांबळी, विकास चेंदवणकर, सचिन मोर्वेकर, नरेश करलकर, अखिल कांबळी, संतोष मुणगेकर, सिद्धेश कांबळी, दिलीप मोर्वेकर, अनिल कांबळी, सुशिल शेडगे, उमेश निवतकर, निलेश रेवंडकर, ओम कांबळी, आर्यन वराडकर, निलम मयेकर, विनया कांबळी, स्वाती अमित कांबळी,अनुष्का वराडकर, मंगल पोयरेकर, मालवणकर आणि रेवंडी ग्रामस्थ उपस्थित होते.