मनसेकडून युवा नेतृत्वाचा सन्मान ; मालवण तालुकाध्यक्षपदी प्रीतम गावडे यांची नियुक्ती
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालवणात युवा नेतृत्वाचा सन्मान केला आहे. मनसेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी चौके येथील युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे नेते शिरीष सावंत, संदीप दळवी, गजानन राणे यांच्या पाठपुराव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “राजगड” मुख्य कार्यालयातून ही नियुक्ती जाहीर केली आहे.
चौके येथील युवा उद्योजक प्रीतम गावडे हे सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले असून संघटना वाढीसाठी त्यांच्याकडून सुरु असलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन मनसेच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.