भाजपा आमदार श्रीकांत भारतीय उद्या मालवणात !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मालवणच्या पर्यटन विकासासाठी दौरा 

मालवण | कुणाल मांजरेकर 

भारतीय जनता पार्टी मार्फत मालवण शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय हे उद्या शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर रोजी मालवण शहरात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा येथे केली. हा मोठा ऐतिहासिक वारसा असूनही ऐतिहासिक दृष्ट्या व पर्यटन दृष्ट्या आवश्यक असणारा विकास या ठिकाणी झाला नाही. ही बाब पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा संयोजक माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर या संबंधित आवश्यक निधी आणि शाश्वत विकास पर्यटन दृष्ट्या विकास कसा होऊ शकतो हे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार श्रीकांत भारतीय व भाजपा डॉक्टर सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. अमेय देसाई हे मालवण शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून पाहणी करण्यासाठी उद्या शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मालवण शहरात येणार आहेत. दुपारी १२.३० वा. मोरयाचा धोंडा येथे पाहणी व चर्चा, दुपारी १.२० वा. मालवण भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट, दुपारी १.५० वा. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी कामाचा आढावा असा त्यांचा दौरा असेल.

या दौऱ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष  प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, बाबा मोंडकर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!