दोन लाखांची मदत : कातवड मधील परब कुटुंबियांना भाजपाकडून मदतीचा हात !

पालकमंत्र्यांकडून मदत उपलब्ध ; भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा

मालवण | कुणाल मांजरेकर

तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घरास दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत पालकमंत्र्यांना माहिती मिळताच भाजपच्या माध्यमातून परब कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत ही मदत सुपूर्द करण्यात आली. भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी यासाठी पाठपुरावा केला.

मालवण तालुक्यातील कातवड गावातील आपत्तीची माहिती माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना मिळाल्यानंतर स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. यावेळी या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये भाजपच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सुपूर्द केले. शुक्रवारी दुपारी श्री. सावंत यांच्या उपस्थितीत ही रक्कम संबंधिताना सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, रवी टेंबूलकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, भाऊ फणसेकर, बूथ अध्यक्ष हेमंत परब, बाळा चव्हाण, भाई लोके, हनुमंत चौघूले, हनु धुरी, हेमंत परब, नीलेश परब, दिगंबर लोके, भाऊ फणसेकर, सचिन नरे, पप्या कांबळी, संजय कांबळी, पिंट्या चव्हाण, सत्यवान लोके, संजय धुरी, सुरेंद्र बागवे, अभी शुंगारे, सोहम धुरी, गोपाल बागवे, राजा चव्हाण, दिपक कोरगावकर, दिनेश कोरगांवकर, समीर चव्हाण, शैलेश चव्हाण, मयूर कदम, शंकर लोके आदी उपस्थित होते.

पालकत्व निभावणारा पालकमंत्री

कातवड मधील दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री रवींद्र चव्हाण व्यतिथ झाले. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे शासनाकडून पंचनामा पूर्ण होऊन मदतीची रक्कम मिळेपर्यंत वाट न पहाता त्यांनी स्वतःच्या खिशातून दोन लाख रुपये या कुटुंबाला दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने पालकत्व निभावल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!