चिंदर गावातील विकासाचे प्रत्येक काम करण्यासाठी कटीबद्ध !
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही ; चिंदर गावात तब्बल १४ कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने
भाजपा नेते, माजी खा. निलेश राणे यांचीही सदिच्छा भेट
मालवण | कुणाल मांजरेकर
ग्रामीण भागातील प्रत्येक व्यवस्था सुधारली पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत गतीने काम करण्यास सुरुवात केली आहे. चिंदर गावाशी माझं विशेष नातं असून या गावातील विकासाचे प्रत्येक काम करण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध आहोत. येथील विकासाची उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाही राज्याचे सर्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिंदर (ता. मालवण) येथे बोलताना दिली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून चिंदर गावात तब्बल १४ कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, राजु राऊळ, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, विजय निकम, विरेश पवार, राजन गांवकर, राजन पांगे, संतोष कोदे, संतोष गांवकर, मंगेश गांवकर, नारायण पाताडे, चिंदर सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वै, महेंद्र मांजरेकर, सानिका चिंदरकर, प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, मनोज हडकर, रवि घागरे, अरविंद घाडी, अनिल घाडी, भाई अपराज, हिमाली अमरे, दक्षता सुर्वे, स्वाती सुर्वे, शेखर कांबळी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चिंदर मधील ग्रामस्थ मधुकर पाताडे यांच्या हस्ते विकास कामांची भूमिपूजने करण्यात आली. यानंतर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री ना. चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रासंचालन महेश मांजरेकर यांनी केले तर उपसरपंच दीपक सुर्वे यांनी आभार मानले.
काही नटद्रष्टांकडून पालकमंत्री – निलेश राणेंमध्ये भांडण लावण्याचे काम : धोंडू चिंदरकरांचा संताप
भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी चिंदर गावातील विकास कामाना पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याबद्दल आभार मानले. चिंदर गाव मालवण तालुक्यातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेले गाव असून या गावाला आपण भरभरून दिले आहे, त्यामुळे आपले ऋण आम्ही विसरू शकत नाही, असे सांगून पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. पण काही नतद्रष्ट मंडळी त्यांच्यात भांडण लावण्याचे काम करत आहेत. ही किड वेळीच ठेचायला हवी. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण अतिशय चांगले काम करीत असून आपण असेच आमच्या पाठीशी उभे राहा. आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत करीत आहात, त्यामुळे मालवण तालुक्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही श्री. चिंदरकर यांनी दिली.
भाजपा नेते निलेश राणे यांची सदिच्छा भेट
भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी चिंदर गावाला भेट देऊन ग्रामदैवत श्री माउलीचे दर्शन घेतले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,उपसरपंच दीपक सुर्वे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.